Breaking News

बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा

मान्यवरांची लाभली उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शनिवारी (दि. 9) पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. लक्ष्मण कनाल आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
पदवीदान सोहळ्यास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य अर्चना ठाकूर, प्रभारी प्राचार्य सानवी देशमुख आदी उपस्थित होते.
या वेळी 180 विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते पदवी स्वीकारल्या. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणार्‍यांना रोख पारितोषिक आणि पदक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रणव ताम्हाणे, तन्वीर पटेल, सुप्रिया म्हात्रे यांनी एलएलबी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातून आणि अस्मिता मिश्रा, पूजा यादव, अलिशा पवार यांनी बीएलएस एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातून यश मिळविले.
कार्यक्रम आयोजनात सहाय्यक प्राध्यापक अनाम मेहेंदीकर, डॉ. प्रा. हिमांशू मोरे, ग्रंथपाल जान्हवी भोईर, सायली उतेकर यांनीही योगदान दिले.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply