Breaking News

पनवेलमध्ये आर्ट फेस्टिवल रंगला

सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आर्ट फेस्टिवल 2022 शनिवारी (दि. 15) पनवेलजवळील स्पाइस वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.

या जिल्हास्तरीय फेस्टिवलमध्ये नृत्य व गायनाच्या स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यात विविध तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रोटेला, एमएन स्कूल (नवी मुंबई)च्या उपसंचालक सीमा जनसोन, शिल्पा शेट्टी, इन्फिनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष आयुफ अकुला, उपाध्यक्ष सोम्या जैन, सरचिटणीस मिहीर रेडीज आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या कठीण काळामध्ये सर्व नियम पाळून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी इन्फिनिटी फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला.

या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नेहरू युवा केंद्र व इन्फिनिटी फाऊंडेशनचे या उपक्रमासाठी कौतुक केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

पनवेलजवळील करंजाडे येथे शुद्ध पाण्याचा प्रकल्प

माफक दरात सेवा; नागरिकांची भागणार तहान पनवेल : रामप्रहर वृत्तनांदी व सनोफी फाउंडेशनच्या वतीने पनवेलजवळील …

Leave a Reply