कर्जत : बातमीदार
जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाईन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल वाटप कार्यक्रमाला जाईन्स ग्रुपच्या रिझवाना लोखंडवाला, मुर्तूझा घडीयाली, आर्वा राजकोटवाला, दिशा केंद्राचे अशोक जंगले, सुमंतू फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढवळे आदी उपस्थित होते. या वेळी शिरसे, तमनाथ कातकरवाडी, जांभूळवाडी, संजयनगर कातकरवाडी, बीड आणि पोसरी येथील 25 विद्यार्थिनींना सायकली देण्यात आल्या. सरपंच आरती भोईर यांनी आभार मानले.