Breaking News

अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा शिरूर यांचा पनवेलमध्ये सन्मान

अलिबाग : रामप्रहर वृत्त
जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा नुकताच पनवेलमध्ये सन्मान करण्यात आला.
पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले.
या वेळी माणगाव तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, राज्य क्रीडा मार्गदर्शक मनिषा मानकर, पनवेल महानगरपालिका क्रीडा समन्वयक समीर रेवाळे आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply