Breaking News

शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन आवश्यक -डॉ. मर्दाने

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार 

शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय आवश्यक असून त्यासाठी पशू प्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण या चार बाबींचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ, रायगड जिल्हा पशू संवर्धन कार्यालय आणि पं. स. यांच्या संयुक्त विद्यमाने मोरेवाडी येथे अनुसूचित जमातीच्या बेरोजगारांसाठी तीन दिवसीय पशुसंवर्धन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. मर्दाने प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्याने आदिवासी बांधवांनी प्रामाणिकपणे या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास त्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास डॉ. मर्दाने यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हसके यांचेही या वेळी भाषण झाले. या कार्यक्रमात पेणचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विष्णू काळे, कर्जतचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. किसन देशमुख, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. सागर कसबे, डॉ. वासुदेव गायकवाड, डॉ. वैशाली पाटील यांनी 150 आदिवासी प्रशिक्षणार्थींना पशुसंवर्धनाशी निगडित विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष मनोहर पादीर, उपसरपंच अतुल लोहकरे, मंडळाचे तालुकाध्यक्ष चाहू सराई, युवा अध्यक्ष प्रकाश बांगारे, उपाध्यक्ष पुंडलिक उघडा, पांडुरंग पुजारा, किसन ढोले उपस्थित होते. या वेळी कुक्कुटपालन योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply