नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका प्रभाग 96 मधील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी भाजप माजी नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. अनेकवेळा पालिका अधिकार्यांशी संपर्क साधून, समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याची तक्रार या वेळी भगत यांनी आयुक्तांकडे केली.नेरूळ सेक्टर-16ए प्रथमेश सोसायटीमागील रस्ता डांबरीकरण करणे, नेरूळ सेक्टर-16ए शिवनेरी आणि परिमल सोसायटीमधील मलनि:स्सारण वाहिनी बदलणे, नेरूळ सेक्टर-16 छत्रपती संभाजी राजे उद्यानातील 5 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे झाड़े पडून तूटलेली खेळणी दुरुस्त करणे, वसई विरार महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेने नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणी बिल भरण्याकरिता पेटीएम, फोन पे, गूगल पे सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा नवी मुंबईकरांना मालमत्ता कर आणि पाणीबिल भरण्याकरिता या सुविधा उपलब्ध करून देणे, नेरुळ प्रभाग क्रमांक-96 मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुशोभीकरण मोहिम राबवून शाळा, मैदान, उद्यान, चौक, पदपथ, समाजमंदिर, सोसायटी सरंक्षक भिंती यांची रंगरंगोटी करून भिंतीवर जनजागृतीपार संदेश लिहावेत. तसेच प्रभागातील रस्ते, गटारे व महावितरण सबस्टेशन परिसरातील डेब्रिज व कचरा स्वच्छ करण्यात यावे, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी या समस्या रूपाली भगत व गणेश भगत यांनी आयुक्तांसमोर मांडल्या.