Breaking News

नवी मुंबई पालिका क्रीडा संघाचे जिल्हास्तरीय कबड्डीत यश

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका कबड्डी संघाने ठाणे जिल्ह्यातील जुन्या व बलाढ्य संघांना पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली संघाने 25-20 अशा पाच गुण फरकाने नवी मुंबई महानगरपालिका संघावर विजय मिळविला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. नवी मुंबई महानगरपालिका संघातील खेळाडू हे कुमार गटात खेळणारे खेळाडू असूनसुद्धा या स्पर्धेमध्ये वरिष्ठ अ गटात खेळून त्यांनी क्रीडाप्रेमींची मने जिंकली. महानगरपालिका संघातील खेळाडू अफ्ताब हसनेत मन्सुरी याने दिवसातील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून तर 27 एप्रिल रोजीचा सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून सुनील राठोड यांचा वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये महानगरपालिकेचे विविध खेळांतील संघ जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम यश संपादन करीत असून नुकत्याच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, जयशंकर क्रीडा मंडळ कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्र अ गटाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून स्वत:च्या कर्तबगारीची नाममुद्रा उमटविली. या संघातील खेळाडू दिपक केवट याची 5 ते 8 मे या कालावधीत पुणे येथे होणार्‍या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेकरिता ठाणे जिल्हा संघात निवड झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त अभिजित बांगर व क्रीडा व सांस्कृतिक कार्य. विभागाचे उपायुक्त मनोजकुमार महाले यांनी संघाचे अभिनंदन करीत पुढील काळात आणखी चांगली कामगिरी करून अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव हे व्यवस्थापक असून रविंद्र सकपाळ यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने हे उज्ज्वल यश संपादन केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply