Breaking News

बोर्लीच्या थेट सरपंचाविरोधात ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर

रेवदंडा : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामसभेत ग्रामस्थांनीही संमती दर्शविल्याने शिवसेनेचे  नौशाद दळवी यांना बोर्लीच्या थेट सरपंच पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी नौशाद दळवी निवडून आले होते. मात्र उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दळवी  यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला होता. शासनाच्या नविन निर्णयानुसार ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गुप्त मतदानाद्वारे समंती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बोर्लीतील प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि. 12) मुरूडचे निवासी नायब तहसीलदार रविंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या विशेष ग्रामसभेला 1356 ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचे  गुप्त मतदान घेण्यात आले. त्यानंतर मत मोजणी झाली. त्यात ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या ठरावाच्या बाजूने 696 तर विरोधात 570 मते पडली. 90 मते बाद झाली. त्यामुळे निर्वाचन अधिकारी रविंद्र सानप सरपंच नौशाद दळवी यांचे विरोधात 126 मतानी विजयी जास्त पडली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply