Breaking News

सीकेटी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान

स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम झाला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला.

या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष यश संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक रक्कम व सन्मानचिन्ह देऊन विशेष गुणगौरव करण्यात आला. या उपस्थित मान्यवरांनी चांगू काना ठाकूर साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, जो तुम्ही मार्ग निवडाल त्यात सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केले. समारंभ अध्यक्ष रामेशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही धेय ठेऊन मार्गक्रमण करा, तसेच जगाच्या कानकोपर्‍यात जाऊन तेथे स्पर्धा करून यशस्वी व्हा आणि आपले व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करा, असे सांगितले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, सुशीला घरत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, शाळा समिती सदस्य जे. वाय बावडे, बी. एस. भोईर, छायाताई ठाकूर, हरचंद्रसिंग सग्गू, जयराम मुंबईकर, चांगू काना ठाकूर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक कैलास मंत्रे, संतोष चव्हाण, अजित सोनावणे, प्रशांत मोरे, अनुराधा कोल्हे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply