Breaking News

फेडररची 101व्या जेतेपदाला गवसणी

मयामी : वृत्तसंस्था

स्वित्झर्लंडच्या 37 वर्षांच्या रॉजर फेडररने 1000 गुणांची मायामी टेनिस स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील 101व्या जेतेपदाला गवसणी घातली. या महान टेनिसपटूने 1000 गुणांची टेनिस स्पर्धा कारकिर्दीत 28व्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. गेल्या आठवड्यात फेडररला इंडियन वेल्स स्पर्धा जिंकण्याचीही संधी होती; पण तिथे डॉमिनिक थीमने त्याला रोखले होते. मात्र मायामी स्पर्धेच्या फायनलमध्ये फेडररने अवघ्या 63 मिनिटांत अमेरिकेचा गतविजेता जॉन इज्नरवर 6-1, 6-4 अशी सहज मात करत जेतेपद खिशात घातले.

मायामी स्पर्धेच्या फायनलमध्ये फेडररने पाचवेळा धडक मारली असून, 2002मध्ये आगासीने त्याला नमवले. त्यानंतर फेडररने 2005मध्ये नदालला नमवून, 2006 मध्ये ल्युबिचिचला नमवून, 2017 मध्ये नदालवर सरशी साधून, तर यंदा इज्नरला हरवून मायामी स्पर्धा जिंकली आहे. माझ्या ध्येयाविषयी विचाराल तर एवढेच सांगेन की, अधिकाधिक जेतेपदे पटकावण्याचा प्रयत्न करायचा, तसेच दुखापतींपासून दूर राहता येईल यासाठी मेहनत घ्यायची. जेणेकरून आयुष्य सुकर होईल. आयुष्यात असेही दिवस येतात जेव्हा गोष्टी मनाजोग्या होत नाहीत, प्रयत्न अपुरे पडतात. मी सध्या फॉर्मात आहे. फिटनेसही ठणठणीत आहे, त्यामुळेच गेल्या चार आठवड्यांपासून मी प्रत्येक दिवशी खेळतो आहे. गेल्या काही वर्षांत असे ठणठणीत मला कधीच वाटले नव्हते. तेव्हा या क्षणांचा मला आनंद घ्यायचा आहे. या क्षणांना दाद द्यायची आहे, असे रॉजर फेडरर म्हणाला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply