Breaking News

‘विराटसेने’चा जय हो!

दुबई : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसर्‍यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) मानाची गदा मिळवली. या मानाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला एक मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले.

1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ वर्षाअखेरीस अव्वल स्थानी विराजमान होतो, त्या संघाला ही मानाची गदा आणि रोख रकमेचा पुरस्कार दिला जातो. टीम इंडियाला सलग तिसर्‍यांदा हा मानाचा पुरस्कार मिळाला. आयसीसीकडून विराट कोहलीला मानाची गदा प्रदान करून टीम इंडियाचा सन्मान करण्यात आला.

संघाच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडने दुसरे स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाच्या बळावर त्यांना वर्षअखेरीस दुसर्‍या स्थानी विराजमान होता आले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या स्थानी आहेत.

हा सन्मान स्वीकारताना विराट म्हणाला की, कसोटी क्रिकेमधील मानाची गदा कायम राखण्यात टीम इंडियाला यश आले याचा मला आनंद आहे. मला टीम इंडियाचा गर्व आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आमचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. अशा वेळी असा सन्मान प्राप्त करणे हे फारच उत्साहवर्धक आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व आणि स्थान आम्ही सारे जाणतो, तसेच या क्रिकेट प्रकारात उत्तम कामगिरी कशी करावी हेदेखील आम्हाला माहिती आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply