Breaking News

थाय बॉक्सिंगमध्येे पनवेलच्या खेळाडूंचे यश

पनवेल : वार्ताहर

शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 14व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट ज्युनियर आणि सीनिअर थाय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पनवेल शहर थाय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या कामोठे व खांदा कॉलनी शाखेच्या खेळाडूंनी सहभाग घेत प्राविण्य मिळवले. विजेत्या खेळाडूंची मध्य प्रदेश येथे होणार्‍या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेत रितेश गोवारी, संतोष सिंग, मानस पाटील, श्रेयस म्हात्रे, पंक्ती पाठक यांनी सुवर्णपदक, तर शिवराज व राजेंद्र कान्हेरे यांनी रौप्यपदक जिंकले. यातील रितेशला 60 किलोखालील वजनी गटात बेस्ट फायटर किताबाने सन्मानित करण्यात आले. हे सर्व खेळाडू कामोठ्यातील सुषमा पाटील विद्यालयात सागर कोळी व खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण संस्थेत प्रतीक कारंडे यांच्याकडे थाय बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत.

विजेत्या खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे, सचिव विनित साठ्ये, कल्याण रॉय चौधरी, चिंतामणी मोकल, स्वप्नाली सणस, अर्जुन लांडगे, आदेश शेपोंडे यांनी कौतुक केले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply