Breaking News

मलेशिया ओपनसाठी किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा

क्वालालंपूर : वृत्तसंस्था

इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्‍या भारताला किदाम्बी श्रीकांतकडून आजपासून (मंगळवार) सुरू होणार्‍या सात हजार डॉलर रकमेच्या मलेशिया ओपनकडून अधिक अपेक्षा आहेत. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या कामगिरीकडेही सार्‍यांचे लक्ष असणार आहे.

श्रीकांतने 2017मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. यानंतर त्याला इंडिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची संधी होती, मात्र त्याचा हा दुष्काळ कायम राहिला. त्याला इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ही कामगिरी त्याचा आत्मविश्वास उंचावणारी ठरली. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आता तो मलेशिया ओपनमध्ये काय कमाल दाखवितो, याकडे सार्‍यांचे लक्ष असणार आहे. श्रीकांतीच बुधवारी सलामीची लढत इंडोनेशियाच्या इहसान मौलाना मुस्तोफाविरुद्ध होईल. जागतिक क्रमवारीत श्रीकांत सातव्या, तर मुस्तोफा

40व्या स्थानावर आहे. यापूर्वी हे दोघे दोन वेळा आमनेसामने आले होते. यात दोघांनी प्रत्येकी एक लढत जिंकली आहे. इंडिया ओपनचे विजेतेपद मिळवल्यानंतर श्रीकांत म्हणाला होता की, गेल्या आठवड्यातील कामगिरीने मी समाधानी आहे. आता ही विजयी मालिका आणि फॉर्म मला आगामी स्पर्धेत कायम राखायचा आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply