मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा केला जात आहे, मात्र या संदर्भात राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरू असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
निरूपम यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहीम सुरू असून, शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेतंर्गत 23 स्वाक्षर्या असणारी चिठ्ठी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …