Breaking News

अलिबागकरांना आकाश दर्शनाची संधी

अलिबाग : प्रतिनिधी
येत्या 21 डिसेंबरला सूर्यमालेतील गुरू आणि शनी ग्रह एकमेकांजवळ येणार आहेत. या ग्रहांना पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे. संविधान जागर यात्रा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 18 आणि 19 डिसेंबर रोजी आकश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खगोलशास्त्रज्ञ एस. नटराजन आणि अलिबागमधील आकाश निरीक्षक राम जोशी या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. गुरू आणि शनी ग्रह तब्बल आठशे वर्षांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येणार आहे. हा दुर्मिळ योग पहाण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे. 18 व 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 ते 10दरम्यान हा आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. दुर्बिणीतून खगोल दर्शनाची संधी या कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांना मिळणार आहे. आकाशातील ग्रह तारे यांची माहितीही यावेळी उपस्थितांना दिली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन निवडक 60 जणांनाच या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी खगोलप्रेमींनी नोंदणी करणे आवश्यक असून, नाममात्र शुल्क आकारले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी सहयोग पतसंस्था (अलिबाग) येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन अपनिंग निगळे, दिलीप जोग व नितिन कुमार राऊत यांनी केले आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply