Breaking News

माथेरान मिनीट्रेन शटल सेवेच्या गाडीला डबे वाढवून देण्याची मागणी

कर्जत : बातमीदार
नेरळ-माथेरान ही मिनीट्रेनसेवा बंद असली तरी अमनलॉज-माथेरान ही शटल सेवा सुरू आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता शटल गाडीला लावलेले डबे कमी पडत असल्याने या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या शटल सेवेला सहा डबे असून या अगोदर शटल सेवेला आठ डबे होते. दोन डबे कमी झाल्यामुळे पर्यटक नाराज होत आहेत. त्यांना दस्तुरी नाक्यापासून पायपीट करण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गाडीला दोन डबे जोडले तरी इंधन खर्च वाढणार नाही. व एका फेरीत साठ पर्यटक प्रवास करू शकतील. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात  भर पडेल. सध्या सहा डबे लावून अप-डाऊन मार्गावर बारा फेर्‍या सुरू आहेत. त्यातच दोन डब्बे जोडून ही शटल आठ डब्यांची करावी, असे लेखी पत्र अरविंद शेलार यांनी स्टेशन मास्तर यांना दिले आहे. या वेळी भाजपचे शहर सचिव संजय भोसले उपस्थित होते.

अमन लॉज-माथेरान शटलला चार प्रवासी आणि दोन मालवाहू असे सहा डबे आहेत. त्यांना पूर्वीसारखे दोन डबे लावून जर शटल चालवली तर पर्यटकांना मिनीट्रेनचा आनंद घेता येईल. तसेच रेल्वेचे उत्पन्नही वाढेल. दोन डबे वाढवले तर रेल्वेला एक कोटी 16 लाख 64 हजार रुपये इतके उत्पन्न मिळू शकते.
-अरविंद शेलार, व्यापारी

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply