मुंबई ः कोरोनामुळे धक्का बसलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर कमी केला. त्याचा फायदा लोकांसह बिल्डरांनाही होतोय. घरांची विक्री वाढली असताना यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुद्दामहून इंग्रजीत पत्र लिहित असल्याचेही ते म्हणाले. स्टॅम्प ड्युटीत सूट देऊन मूठभर खासगी लोकांचे भले केले जात आहे, मात्र त्यामुळे राज्य सरकारचे हजारो कोटींचे नुकसान होते. त्यामुळे हा निर्णय तत्काळ थांबवावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. बांधकाम क्षेत्राला उभारीसाठी दीपक पारेख यांच्या समितीने सुचवलेल्या सोयीच्या अशाच शिफारशी लागू करण्यात आल्याचा आरोपही फडणवीसांनी या वेळी केला.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …