नागोठणे : प्रतिनिधी
स्थानिक आमदार रविशेठ पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सूचनेनुसार विभागातील चिकणी येथील रोहे पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी एका विशेष कार्यक्रमात मारुती देवरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. देवरे यांच्या नियुक्तीमुळे नागोठणे विभागासह संपूर्ण दक्षिण रायगडमध्ये भाजप आणखी मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper