Thursday , March 23 2023
Breaking News

‘मेंदडीत डेंग्यूची लागण नाही’

म्हसळा ः वार्ताहर

तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील मेंदडीकोंड व परिसरातील काही रुग्णांना थंडी, ताप, सर्दी, उलटी, अंगदुखी होऊ लागल्याने तपासण्या केल्या असता रक्तातील फ्लेटलेटस् कमी आसल्याचे आढळले व रुग्ण डेंग्यूसदश्य रुग्ण आसल्याची भीती व्यक्त झाली. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, येथे डेंग्यूची लागण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तालुक्यातील विविध खाजगी लॅबमध्ये सुमारे 30 ते 40 रुग्णांच्या तपासण्या झाल्या. त्यामध्ये एक रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याची चर्चा होती. डेंग्यू, मलेरिया, अनुवांशिक आजार आणि केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply