Breaking News

वानिवली पुलाच्या दुरुस्तीचा सा. बांधकाम विभागाला विसर

खोपोली : प्रतिनिधी

आठ दिवसात वानिवली येथील पुलाचे संरक्षक कठङे दुरूस्ती करू, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनाला आठ महिने होत आले तरी कामाला सुरुवात न झाल्याने प्रवासी

संतप्त आहेत.

खालापूर तालुक्यातील महत्वाचा राज्यमार्ग असलेल्या सावरोली – खारपाडा मार्गावरील वानिवली पुलाचा संरक्षक कठङा अखेरची घटका मोजत आहेत. ऑगस्ट 2018मध्ये या पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी केली होती.त्यावेळी आठ दिवसात तात्पुरती दुरूस्त करू, असे  आश्वासन मिळाले होते. मात्र त्यानंतर आठ महिने होत आले तरीही पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तीन वर्षापासून खड्ड्यात असलेला सावरोली – खारपाडा मार्गाच्या दुरस्तीचा नारळ नुकताच फुटला असून, काही भागात कामाला सुरुवात झाली आहे. रस्त्याचे काम होत असतानाच वानिवली पूलदेखील सुरक्षित झाल्यास अपघाताच्या सावटाखाली असणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

वानिवलीकडून पाताळगंगा औद्योगिक वसाहतीकङे जाताना रस्ता तीव्र उताराचा व अरुंद आहे. त्यानंतर लगेच धोकादायक पूल आहे.  रात्रीच्या वेळेस पूलावर मोठे वाहन आल्यास दुचाकी चालक गोंधळून जातो. पुलाचे संरक्षक कठडे मजबूत बांधणे आवश्यक आहे

-किरण पाटील, ग्रामस्थ,

माजगाव, ता. खालापूर

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply