अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आणखी चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली. अनंत पद्मा गीते (अपक्ष), मिलिंद भागुराम साळवी (बहुजन समाज पार्टी 2 अर्ज), मधुकर महादेव खामकर (अखिल भारत हिंदू महासभा), संदीप पांडुरंग पार्टे ( बहुजन महा पार्टी) अशी या उमेदवारांची नावे आहेत. यामुळे आता एकूण नामनिर्देशन पत्रे भरलेल्या उमेदवारांची संख्या बारा झाली आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper