Thursday , March 23 2023
Breaking News

आचारसंहिता संपताच एसटीला मिळणार नव्या बसेस 1300 नवीन एसटी गाड्या प्रतीक्षेत

पेण : प्रतिनिधी

निवडणूक आचारसंहिता यामुळे एप्रिल ते जून या गर्दीच्या काळात टप्याटप्यात येणार्‍या नवीन एसटी बसची निविदा प्रक्रिया पूर्णपणे थांबली असून, त्यामुळे या नवीन बस गाड्या आत आचारसंहिता संपल्यानंतरच दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाने टू बाय टू परिवर्तन, स्लीपर आणि सीटर अशा दोन्ही सेवा असलेली एसटी तसेच वातानुकूलित शिवशाही अशा 1300 नवीन बस गाड्यांसाठी बाहेरून सांगाडा खरेदी आणि बस बांधणीची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती आणि 2 मार्चपर्यंत अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते. निविदेवर निर्णय झाला असता तर 45 दिवसानंतर म्हणजे गर्दींचा हंगाम असलेल्या 15 एप्रिलनंतर टप्याटप्यात या गाडया येण्यास सुरूवात झाली असती. मात्र एसटी महामंडळाकडून निविदेमध्ये वारंवार काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले गेले आणि ही प्रक्रिया पुढे गेली. त्यातच 11 मार्चपासून लोकसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळे महामंडळ कामाचे आदेशही काढू शकले नाही. राज्यातील निवडणुका 29 एप्रिल रोजी संपत आहेत. त्यावेळी आचारसंहिता शिथिल होत असल्याने त्यानंतर 1300 बस गाड्यांच्या कामाचे आदेश काढून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 1300 बस गाड्यांसाठी लागणारे सांगाडे बाहेरून खरेदी करतानाच बस बांधणीदेखील बाहेरून केली जाणार आहे. मात्र नमुना बस गाड्यांची प्रक्रिया राबवतानाच प्रत्यक्षात येणार्‍या बस गाड्यांची निविदा आणि कामाचे आदेश वेळेत पूर्ण झाले असते, तर आचारसंहितेत या बस गाड्या आडकल्या नसत्या.

Check Also

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) …

Leave a Reply