Breaking News

गणेशभक्तांसाठी वाहतूक पोलीस सज्ज, ठिकठिकाणी नेमणार बंदोबस्त

पनवेल ः बातमीदार

दि. 2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. परिसरातल्या बाजारपेठा देखील बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या आहेत. गणेशभक्तचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त नेमणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत पळस्पे येथे वाहतूक पोलिसांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सावासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तंचा प्रवासा विनाअडथळा व्हावा, त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नोकरीनिमित्त नवी मुंबई परिसरात स्थायिक झालेले नागरिक गणेशोत्सवाला आपल्या गावी जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत असते. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी वाहतूक पोलीस नियमन करत असतात. दिवस-रात्र पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवीमुंबईसह पनवेल परिसरात, मुंबई गोवा महामार्गावर जाणार्‍या मार्गांवर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply