Breaking News

डॉ. दिप्ती पाटील करणार सुकापूरचा कायापालट

पनवेल : प्रतिनिधी

इंजिनियर घडविणार्‍या डॉ. दिप्ती योगेश पाटील सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीत नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या सबळीकरणासाठी प्रभाग 1 मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग येथील नागरिकांना व्हावा यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले.

एका इंजिनियरींग महाविद्यालयाच्या डीन असलेल्या मूळच्या विदर्भातील डॉ. दिप्ती या योगेश पाटील यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर पनवेलमध्ये आल्या. आपल्या पतीची सामाजिक कार्याची आवड पाहून त्यांनी ही सामाजिक कार्याला सोसायटीपासून केली. सोसायटीतील गटार तुंबल्यामुळे पाणी साचायचे. त्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जेसीबीने खड्डे खणून पाइप टाकून पाणी जाण्यासाठी मार्ग काढून दिल्याने पाणी तुंबणे बंद झाले. त्यावेळी सोसायटीतील लोकांनी तुमच्यामुळे हे काम होऊ शकले सांगून प्रोत्साहन दिल्याने डॉ. दिप्ती यांना सामाजिक कार्य करण्याचा उत्साह निर्माण झाला.

सुकापूरमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांची होणारी अडचण, महिलांचे होणारे हाल पाहून त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पती योगेश पाटील यांनी ही त्यांना प्रोत्साहन दिले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेऊन त्यांनी भाजपतर्फे प्रभाग 1 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुकापूर ग्रामपंचायत क्षेत्रात रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्याची समस्या सोडविण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत. सुकापूर ग्रामपंचायतीत प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने रुग्णाला पनवेल येथील खाजगी रुग्णालयात न्यावे लागते. त्यासाठी होणारा खर्च परवडत नाही. याची जाणीव ठेऊन त्यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

आपल्या शिक्षणाचा फायदा महिलांना व्हावा यासाठी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी आणलेल्या योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देणे. त्यांनी बनविलेल्या मालास विक्री केंद्र उभारून महिलांची आर्थिक उन्नती करणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. दिप्ती पाटील यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply