Breaking News

रायगडात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

299 मतदान केंद्रांवर एक लाख 77 हजार 383 मतदार बजावणार हक्क

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवर एक लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली, तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.  
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील व सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 78 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 

Check Also

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे …

Leave a Reply