पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे बुधवारी (दि. 13) महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, पोलीस निरीक्षक चवरे, नगरसेविका दर्शना भोईर, मनोहर मुंबईकर, सपना पाटील, शैला आंबेकर, गिता म्हात्रे, आरपीएफची एक महिला अधिकारी व 12 महिला सदस्य आदी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान रेल्वे परिसरात कोणतीही चीजवस्तू अगर संशयित व्यक्ती आढळल्यास तसेच महिलांचे छेडछाडीचे प्रकार, बालमजूर अथवा कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तसेच नशापाणी केलेले व्यक्ती दिसल्यास (एनडीपीएस) ड्युटीवरील पोलीस, स्टेशन मास्तर यांना कळविण्यात यावे. तसेच रेल्वे पोलीस हेल्पलाईन 1512 व आरपीएफ हेल्पलाईन 182 वर माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांनी रात्रीच्या वेळेस महिलांच्या आरक्षित डब्यातून व जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करत असलेल्या डब्यातून प्रवास करावा. याबाबत सूचनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकारण करण्यात आले.