पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेतर्फे रोटरी जिमखाना येथे पनवेलमधील वकिलांसाठी मंगळवारी (दि. 22) लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. त्याठिकाणी 200 वकिलांना व्हॅक्सीनेशनची सोय करण्यात आल्याबद्दल पनवेल वकिल संघटनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त व डॉक्टरांचे आभार मानण्यात आले. पनवेलमधील वकीलांना व्हॅक्सीनेशन करण्याची मागणी वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्फत महापालिका आयुक्तांकडे केली होती. महापालिकेतर्फे 200 व्हॅक्सीनेशन उपलब्ध करून दिले. पनवेलच्या रोटरी जिमखान्यात 112 वकिलांचे व्हॅक्सीनेशन करण्यात आले. बुधवारी 88 वकिलांचे व्हॅक्सीनेशन करण्यात येणार आहे. याबद्दल जिल्हा न्यायाधीश स्वामी, रायगड जिल्हा विधी सेवा समिती सचिव सिनियर डीव्हिजन न्या. भाकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख व डॉ. आनंद गोसावी यांचे पनवेल वकिल संघटनेतर्फे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, उपाध्यक्ष अॅड. जे. डी. पाटील, सचिव अॅड. प्रल्हाद खोपकर, अॅड. धनराज तोकडे, अॅड. विशाल डोंगरे, अॅड. अविनाश भोईर यांनी आभार मानले.