पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील जी 1 तिर्थ पूनम को. ऑपरेटिव्ह सोसायटी येथे 13 व 14 जानेवारीला सहयोग स्नेह सेवा संस्थेच्या वतीने श्री रामचरित मानस अखंड पाठ मोठ्या उत्साहात तसेच भक्तीपूर्ण व मंगलमय वातावरणात झाला. या अखंड रामायण पाठाला आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड आणि नवी मुंबई सुंदरी डॉ. मधु निमकर, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका राजश्री वावेकर यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात होमहवन, महाआरती, पत्रकार सन्मान सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम झाले. पत्रकार मिलिंद खारपाटील, अनंत गोळे, दिपक घोसाळकर, मयूर तांबडे, सुनील कटेकर, लक्ष्मण ठाकूर, राजेश प्रधान, अमित पाटील, धर्मेंद्र प्रधान, अनिल कुरघोडे, संतोष ठाकूर, रुपाली वाघमारे आदी पत्रकारांना कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून पत्रकारिता केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोग स्नेह सेवा समितीचे अध्यक्ष कैलाश मिश्रा, सचिव संतोष बहेन दीदी, पुष्पा तिवारी, येन के पांडेय आदींनी मेहनत घेतली.