Breaking News

म्हसळ्यात 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

तालुक्यात 49 हजार 530 मतदार, 72 मतदान केंद्र

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यांत 49 हजार 530 मतदार असून, 72 मतदान केंद्रे आहेत. निवडणुक कालावधीत गोंधळ होऊ नये म्हणून, सुमारे 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सांगीतले.

निवडणुकी दरम्यान गोंधळ घालण्याची शक्यता असणार्‍या, अवैध दारु विक्री करणार्‍या, यापूर्वी गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तींची तसेच यापूर्वी झालेल्या निवडणुकांत व्यत्यय आणणार्‍यांची माहिती पोलीस रेकॉर्डला असते. त्यामाहितीच्या आधारे रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हेगारीवृत्तीच्या  252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

निवडणुकीच्या काळात तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुरूड पोलीस सतर्क झाले आहेत. तालुक्यात 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

-प्रविण कोल्हे, सहाय्यक निरीक्षक, म्हसळा पोलीस ठाणे

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply