नवी मुंबई : प्रतिनिधी
श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल व श्री साई ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारा येथे रक्तदान शिबिर झाले. संस्थेच्या अध्यक्ष आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी 2 वाजेपर्यंत 83 नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला.
माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. या वेळी माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, स्वाती साटम-गुरखे, समाजसेविका चैताली ठाकूर, दामोदर पिल्ले, संजय ओबेरॉय, किरण वर्मा, जयदेव ठाकूर, एकबलसिंग रंधावा, जसबीरसिंग रंधावा, बलदेवसिंग, तसमीरसिंग, मेजरसिंग, गुरमितसिंग, यशपालसिंग बागल, आरती राऊळ, देवयानी मुकादम, लक्ष्मण मार्के, डॉ. रंजना आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गेली 25 वर्षे सामाजिक कार्य, आरोग्य शिबिर आयोजिक करून सेवा कार्य करण्यात येत आहेत. गेले दीड वर्षे नागरिकांना कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या संकटाचा सामना करावा लागत असताना इतर आजार दुर्लक्षित करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत रक्ताचा साठाही अपुरा पडत असल्याने रक्तसाठ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून येथील स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. कोणत्याही रुग्णास रक्तसाठ्याची कमतरता भासू नये यासाठी बेलापूर मतदारसंघातील सर्वच प्रभागात असे रक्तदान शिबिरे आयोजित आमचा मानस असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.