पनवेल : बातमीदार
जास्त परताव्याचे आमिष दाखवून व पंचवीस हजार रुपये भरून 20 लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगून 117 जणांची 57 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार नवीन पनवेल परिसरात घडला आहे पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीचे मालक मुकरम अली अन्सारी व रेखा कांबळे यांनी वेळोवेळी नाव बदलून पंचवीस हजार रुपये भरून लोन देतो असे नागरिकांना सांगितले होते. फिर्यादी संगिता धारु राठोड याना हा त्याचे नाव महंमदअली असे सांगत असे तर रेखा कांबळे हे त्याचे नाव मनीषा व कलिका असं सांगत असे. मुकरम अली अन्सारी उर्फ मोहम्मद अली अन्सारी उर्फ एम एम अशी सांगुन ते मे. अल्फा गोल्ड या फायनान्स कंपनीचे मालक असल्याचे तसेच या महीलेने स्वतःची ओळख रेखा कांबळे उर्फ मनिषा गमरे उर्फ कलिका कांबळे अशी सांगून ती कंपनीची ग्रुप लिडर असल्याचे सांगीतले. अल्फा गोल्ड या फायनान्स कंपनीचे हेड ऑफिस 131, एम जी रोड, अमीर गंज, न्यु दिल्ली येथे असुन नमुद फायनान्स कंपनीची स्विस 999, 24 करेट गोल्ड, झुरीच, स्वित्झर्लन्ड येथे शाखा असल्याचे नागरिकाना सांगत आसत. ही फायनान्स कंपनी हि 20 लाख रुपयांपर्यत पर्सनल व बिजनेस लोन देते असे सांगून या कंपनीमध्ये सभासद होण्यासाठी सुरुवातीला 20 हजार रुपये रक्कम ठेव म्हणुन जमा करावी लागेल असे सांगायचे. तसेच सभासदाकडुन स्विकारलेली रक्कम ते शेअर मार्केटमध्ये गुंतवितात. त्यांनतर कंपनी तात्काळ सभासद झालेल्या व्यक्तीला लाभांस म्हणुन विनापरतावा 20 लाख रुपयांपर्यत पर्सनल व बिजनेस लोन देते असे सांगून शेकडो नागरिकाकडून लाखो रुपये जमा केले व त्यातील प्रत्येकाला 15 लाख रुपये डिमांड ड्राप्टव्दारे मिळतील, उर्वरीत 5 लाख रुपये रोखीने मिळतील असे सांगितले होते. हे 5 लाख रुपये कंपनीच्या ग्रुप लिडर रेखा कांबळे यांना कमिशन म्हणुन दयावी लागेल असे सांगून पैसे गुंतवणूक केलेल्या प्रत्येकाला प्रत्येकी 15 लाख रुपयाचे डिमांड ड्राप्टच्या छायांकीत प्रती दिल्या. व त्यांची फसवणूक केली. याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ज्यांची या प्रकरनात फसवणूक झालेली असेल त्यानी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वपोनि शिंदे यानी केले आहे.