पुणे : प्रतिनिधी
सिम्बायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना मराठी भाषा समजत असतानाही, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी भाषण इंग्रजीत केल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.
एकीकडे राज्यपाल, मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना मराठी बोलण्याचा आग्रह धरतात, तर दुसरीकडे मराठी भाषा विभागाचे मंत्री इंग्रजीत भाषण करतात अशी कुजबुज समारंभात होती. देसाई यांनी भाषणाला सुरुवात मराठीतून केली. त्या वेळी सर्व उपस्थितांनी दाद दिली, मात्र नंतर देसाईंनी इंग्रजीतून भाषण केल्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. मराठी भाषा विभागाचे मंत्रीच मराठीत भाषण करीत नाही, तर मराठी भाषेचा प्रसार-प्रचार कसा होईल, असा नाराजीचा सूर उपस्थितांमध्ये उमटला.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …