खोपोली : प्रतिनिधी
काशी विश्वनाथ धाम किंवा काशी विश्वनाथ कॅरिडॉराच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य सााधून खोपोली भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 13) सकाळी शहरातील दक्षीण मारूती मंदिराच्या सभागृहात साधू, संत, तसेच कीर्तन व प्रवचनकरांचा सत्कार करण्यात आला.
भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरशेठ खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेद उपासक सिद्धेश सुळे, कीर्तनकार प्रवीण महाराज शिंदे, हभप शंकर जाधव, दक्षिण मारुती मंदिर मुख्य पुजारी गोडबोले, विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा जिल्हा महामंत्री रमेश मोगरे, आध्यात्मिक आघाडीचे संयोजक काशिनाथ पारठे आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष अश्विनीताई पाटील, भाजपचे शहराध्यक्ष इंदरशेठ खंडेलवााल, सेक्रेटरी हेमंत नांदेे, प्रमोद पिंगळे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, वामनराव दिघे, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष अजय इंगुळकर, चिटणीस गोपाळ बावस्ककर, जिल्हा महिला मोर्चा खजिनदार रसिका शेटे, ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख, विजय तेंडुलकर, राहुल जाधव, सुनिता महर्षी, सुधाकर दळवी, लालजी मिश्रा आदींसह प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रोजेक्टरद्वारे वाराणसी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पडद्यावर दाखवण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘दिव्य काशी भव्य काशी‘ अंतर्गत विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उपस्थितांना बघता आला. विश्व हिंदू परिषदेचे रमेश मोगरे यांनी उपस्थित साधु, संतांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दक्षिण मारुती मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.