भालचंद्र घरत आणि कुटुंबीयांकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी पनवेल येथील भालचंद्र घरत गुरुजी आणि कुटुंबीयांनी एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश त्यांनी शनिवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केला.
या वेळी घरत गुरुजींच्या सुविद्य पत्नी भारती घरत, पुत्र संजय घरत, सून व माजी नगरसेविका अर्चना घरत आदी उपस्थित होते. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत आपलेही थोडेबहुत योगदान असावे या दृष्टीने घरत कुटुंबीयांनी समर्पण निधी दिला आहे.