व्हॅलेंटाइन डेनिमित्त भाजप युवा मोर्चाचा अनोखा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत
व्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल यांच्या वतीने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘एक दिवस प्रेमाचा’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानुसार खारघरच्या मॅकडॉनल्डमध्ये गिरीजघर येथील अनाथ मुलांसोबत हा दिवस पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 13) साजरा करण्यात आला.
या वेळी नगरसेवक हरेश केणी, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा अध्यक्ष विनोद घरत, भाजप सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, अल्पसंख्याक सेलचे मन्सूर पटेल, अमर उपाध्याय, चिटणीस पप्पू खामकर, फुलाजी ठाकूर, शुभ पाटील, अक्षय पाटील, प्रमोद पाटील, सुशांत पाटोळे, निखिल जाधव, सुजित पांडे, नाईम शेख, सचिन चिखलकर यांच्यासह गिरीजघर अनाथालयातील मुले उपस्थित होती. या वेळी या अनाथ मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला.