उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील चिर्ले गावचे निळकंठ घरत यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शेलार यांनी घरत यांचे अभिनंदन केले.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, दीपक भोईर, सुधीर घरत आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी निळकंठ घरत यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.