अलिबाग : प्रतिनिधी
ठाणे, रायगड जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघाची सभा नुकतीच अलिबागमधील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाली.
रायगडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिश विभा इंगले, जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. मलशेट्टी, अधीक्षक पालवणकर, बेलीफ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्यासह ठाणे व रायगड जिल्ह्यातील सर्व बेलीफ बांधव, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी बेलीफ या सभेला उपस्थित होते.
ठाणे रायगड जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर तु. कर्ले यांनी प्रास्ताविकात बेलीफ कर्मचार्यांना दैनंदिन कामकाज येणार्या अडचणी मांडल्या व त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली. संघटनेचे महेंद्र भोसले, दिनेश कृष्णा पाटील, नंदकुमार द. पालवणकर, बिपीन मोरे, तुषार पाटील, विनोद नाईक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
रायगडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिश विभा इंगले तसेच जिल्हा व सत्र न्यायाधिश मलशेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.