पनवेल : रामप्रहर वृत्त
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रविवारी (दि. 14) दिशा एन्टरटेन्मेन्ट अॅण्ड न्युजचा ‘दिशा सन्मान 2021’ हा सोहळा दिमाखात झाला. ह्या सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रमाची रेलचेल पहायला मिळाली, महिलांसाठी समूह नृत्य स्पर्धा, आरोग्यावर चर्चा, हळदी कुंकू समारंभ व 15 विविध शासकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा अस भरगच्च कार्यक्रम नियोजनपुर्वक आयोजित करण्यता आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, डॉ. गिरीश गुणे उपस्थित होते, तर एनयूजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर, नवी मुंबईच्या नगरसेविका कोमल वास्कर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. गायिका सोनाली सोनावणे, प्रशांत नाक्ती, विजय सोनवणे, प्रवीण कोळी, विनोदवीर झू झू किंग रंजीत ठाकूर, अभिनेता गिरीश म्हात्रे नृत्य दिग्दर्शक प्रशांत पवार आदींंनी छोटे परफॉरमन्स सादर केले. ह्या कार्यक्रमाची सुरुवात दिशा एंटरटेनमेंट अॅण्ड न्यूजचे संपादक व दिशा सन्मान सोहळ्याचे आयोजक सुनील कटेकर, डॉक्टर संजीवनी गुणे, मीना कटेकर, सुशीला घरत आदींच्या हस्ते दिपप्रज्वलाने करण्यात आली. ह्या सोहळ्यातील नृत्य स्पर्धेचे परीक्षण लावणी सम्राट आशिमिक कामठे, प्रशांत पवार ह्यांनी केले. ह्या वेळी अनेक संघ उपस्थित होते ह्यामधून तीन विजयी संघ निवडण्यात आले. विजयी संघाना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहिता साळुंखे व कोमल यांनी केले.