Monday , June 5 2023
Breaking News

भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल : वार्ताहर

भाजप युवा मोर्चा महापालिका सरचिटणीस केदार भगत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. 1000 गोरगरिबांना अन्नदान, रस्त्यावरील गरिबांना ब्लँकेटचे वाटप असे विविध उपक्रम या वेळी राबविण्यात आले.

केदार भगत यांनी कोरोना काळात अन्नधान्य वाटप, एन 95चे मास्क, रोग प्रतिकारक शक्तीच्या अर्सेनिक 30च्या गोळ्यांचे वाटप, स्थलांतरित परप्रांतीत्यांना पाण्याची व जेवणाची सोय केली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद व आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेने जनतेची सेवा करण्याचा वसा केदार भगत यांनी हाती घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या वेळी  सुमित दसवते, नितेश भगत, योगेश साळवी, हर्षद गडगे, संकेत दसवते, भावेश शिंदे, सचिन जाचक, गौरव सावंत, साहिल मोरे, जयदीप भगत, मंगेश भगत, निखिल भगत,यज्ञेश पाटील, अनिकेत सावंत, अनिल पशिलकर, शेषनाथ गायकर, मयुर पाटील, ब्रिजेश बहिरा, श्रेयस शिंदे, चैतन्य भगत, कपिल कुरघोडे, नेहाल गायकर, फिरोज शेख, निलेश पाटील श्रेयस  बहिरा, मुन्ना बहिरा, प्रशांत बहिरा, रुपेश गोणे, नैनेश वाघुलकर, सचिन कदम, सिद्धू मोरे, अथर्व पाटील सनी बेंडखळ आदी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply