Breaking News

कळंबोलीत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात

कळंबोली : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र कळंबोली येथील सेक्टर 14 मध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते बुधाजी ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस अशोक मोठे, भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील,  नगरसेवक अमर पाटील, बंजारा समाजाचे नेते मधुकर जाटोत, गणपत राठोड, भगवान पवार इतर समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होत्या. संत सेवालाल महाराजांचे विचार सर्व समाजापर्यंत पोचविण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हायलाच पाहिजे, असे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस अशोक मोटे यांनी सांगितले. तसेच या समाजासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये एखादा प्लॉट मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या समाजाने व्यसनापासून दूर रहावे व आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण द्यावे, असे भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी सांगितले.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply