मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णवाढीच्या दरात वाढ झाली आहे. बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण पाच टक्के झाले असून, चेंबूरमधील एका वार्डात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागला आहे असे सांगून, महापौर किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. बहुतांश लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करीत आहेत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी; अन्यथा आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे जाऊ. लाकडाऊन लागू करायचा की नाही हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे. नागरिकांचा बेजबाबरदारपणा आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम राहिल्यास लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्याबाबतचा निर्णय प्रशासन घेऊ शकते.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …