Breaking News

पोलादपूरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांची भर

पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शहरी भागामधून येणार्‍या चाकरमान्यांचे प्रमाण अद्यापही लक्षणीय असून, यापैकी दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील धारवली येथे 21 जून रोजी भिवंडीहून आलेल्या एका व्यक्तीला 23 व 24 जूनला दम लागल्याने माणगाव येथे उपचारासाठी 25 जून रोजी पाठविण्यात आले होते. तेथे त्याची कोविड-19 टेस्ट झाल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. दुसरा रुग्ण कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दहिदूर्गवाडीत पुणे येथून आलेल्या कुटुंबीयांपैकी एक आहे. त्याच्या कोविड-19 टेस्टचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत 32 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील नऊ डॉक्टरेतर कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर सील करण्यात आलेल्या रुग्णालयातील पाच डॉक्टरांसह 20 जणांचा स्वॅब टेस्टींग रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे आरोग्यसेवेने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात बहिस्थ रुग्ण तपासणी सुरू झाली असून, अंतस्थ रुग्णसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक निर्जंतुकीकरण प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply