पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक बुधवारी (दि. 17) होणार आहे.
सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस नेहमीप्रमाणे समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून, पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी 4 वाजता भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक होणार असून, या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …