Breaking News

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

मोहोपाडा : प्रतिनिधी

बिलिवर्स इस्टर्न ट्रस्टच्या वतीने होप फॉर चिल्ड्रन्स या प्रकल्पाद्वारे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षीदेखील पनवेल तालुक्यातील कोळखे येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

देशातील हजारो विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना शिक्षणात अडथळा येवू नये यासाठी बिलिवर्स ट्रस्टने पुढाकार घ्यावा, असे डॉ. के. पी. योहनन मेट्रोपॉलिटन बिलीवर्स ईस्टर्न चर्च यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी असंख्य शालेय शिक्षण घेणार्‍या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च बिलिवर्स इस्टर्न ट्रस्टच्यावतीने करण्यात येत आहे.

बिलिवर्स संस्था संपूर्ण भारतात 60 हजार विद्यार्थ्यांना मदत करते आणि महाराष्ट्रमध्ये 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत करत आहे. होप फॉर चिल्ड्रन्स प्रकल्पांतर्गत गरजू विद्यार्थ्यांनी 15 वर्षे शिक्षण घेवून पुढे इंजिनिअर, डॉक्टर, वकीलही झाले असल्याचे फादर बेनी इपेन यांनी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टिंक्शनचे पालन करून बिलिवर्स इस्टर्न ट्रस्टच्या वतीने होप फॉर चिल्ड्रन्स अंतर्गत 121 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे रायगड जिल्हा सचिव रमेश कोलांबोली, सामाजिक कार्यकर्ते कुमार नायर, भारत अजित करिया, मुंबई धर्म प्रांताचे सेक्रेटरी फादर बेनी इपेन, सेमिनरी प्रिन्सिपॉल फादर डी. वर्मा, रिजनल कॉडिनेटर जयेश परमार, महेश रावत आणि फिलीप मॅथ्यू, वर्गीस मॅथ्यू आदी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply