Sunday , June 4 2023
Breaking News

अफगाणिस्तानचा आयर्लंडला व्हाईटवॉश

डेहराडून : वृत्तसंस्था

भारतीय संघाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याच वेळी डेहरादून येथे सुरू असलेल्या टी-20त अफगाणिस्तान संघाने तिसर्‍या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगानिस्तानच्या विजयात फिरकी गोलंदाज खान चमकला.

अफगाणिस्तानने मोहम्मद नबीच्या 36 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडला 8 बाद 178 धावा करता आल्या. केव्हिन ओब्रायन (74) आणि अँडी बॅल्बीर्नी (47) यांचा संघर्ष अपयशी ठरला. अफगाणिस्तानने आयर्लंडवर 32 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा सलग टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. पाकने 2018मध्ये सलग 9 सामने जिंकले होते आणि अफगाणिस्तानने 2018-19मध्ये सलग 10 सामने जिंकण्याचा विक्रम केला. त्यांनी 2016-17मध्ये सलग 11 सामने जिंकले आहेत.

रशीदची जादुई फिरकी

या सामन्यात रशीद खानच्या फिरकीच्या जादूने मंत्रमुग्ध केले. त्याने 27 धावा देत आयर्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला. या कामगिरीसह त्याने आतापर्यंत एकाही फिरकीपटूला टी-20 क्रिकेटमध्ये न करता आलेला विक्रम स्वतःच्या नावावर केला. रशीदने या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवली आणि चौथ्या चेंडूवरही विकेट घेतली. टी-20 क्रिकेटमध्ये चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. यासह त्याने श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या चार चेंडूंत चार विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply