Breaking News

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई 2021

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मिस नवी मुंबईच्या 10व्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी (दि. 27) वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्‍या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई 2021 चा ताज योगिता राठोड या सोंदर्यवतीने पटकावला.

सोबतच दुसर्‍या व तिसर्‍या जागेवर अनुक्रमे पायल रोहेरा व अपर्णा पाठक हिने बाजी मारली. परीक्षक म्हणून लिव्हा मिस दिवा सुपरनॅशनल 2020 ची विजेती अवृत्ती चौधरी, मिस आईशिया इंडिया 2018 ची विजेती सिमरण म्हलहोत्रा, मिसेस इंडिया ब्युटी क्विनची विजेती व अभिनेत्री डॉ. इलाक्षी मोरे, संजीव कुमार, अशोक मेहरा यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.

या स्पर्धेचे हे दहावे पर्व होते कोविडमुळे सर्व काळजी घेत आम्ही या स्पर्धेला खंड पडू दिला नाही. या करीत आम्हाला फोर पॉईंट हॉटेलने खूप सहकार्य केले. तसेच आमचे प्रायोजक, दर्शक तसेच पुर्ण टीमला सुद्धा मी धन्यवाद देईल. पुढच्या वर्षी आम्ही नवी मुंबईकरांना आगळावेगळा सोहळा अनुभवास देऊ. या वर्षी शेकडो मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सोळा सौंदर्यवती अंतिम फेरीत गेल्यात. या माध्यमातून आम्ही सामान्य घरातील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत ज्या माध्यमातून मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक या पूर्वी चमकलेत, अशी माहिती आयोजक यू अ‍ॅण्ड आय एन्टरटेन्टमेंटचे हरमीत सिंग यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply