Breaking News

कोप्रोली स्वच्छता अभियान; गतिरोधकांना मारले पांढरे पट्टे

कोप्रोली : प्रतिनिधी : वारंवार होणारे अपघात या संदर्भात उरण पूर्व आणि मध्य या भागातील तरुणांनी एकत्र येऊन एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि त्याचबरोबर वाढणार्‍या गाड्या यामुळे रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे अपघात हे जणू उरणकरांच्या पाचवीलाच पूजले असल्याचे दिसून आले आहे.

प्रशासनातील अधिकार्‍यांच्या या गोष्टीकडे होणारे दुर्लक्ष या गोष्टींना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे इथले व्यावसायिक मुजोर झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे ते याकडे लक्ष देत नाहीत. या सर्व गोष्टींचा आलेला अनुभव आणि उरणच्या राजकीय पुढार्‍यांनी गमावलेली विश्वासार्हता त्यामुळे उरणच्या नवयुवकांनी या विरोधात आवाज उठवण्याचे ठरवले आहे आणि प्रत्यक्षात काम करण्याचे ठरवले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून उरण पूर्व विभागातील कोप्रोली येथील, कोप्रोली स्वच्छता अभियानांतर्गत आज दिनांक 30 मे रोजी, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत रस्त्यांवर असणार्‍या गतिरोधकांना पांढर्‍या रंगाचे पट्टे स्वखर्चाने वर्गणी काढून हे काम पूर्ण करण्यात आले. हे काम कोप्रोली स्मशानभूमी बस थांबा इथपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ते कोप्रोली आवरे रोड पांदिवेच्या आजीकडे या पट्ट्यात करण्याचे ठरले असून ते या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.

या वेळी कोप्रोली स्वच्छता अभियान या संघटनेतील सदस्य शेखर अंकुश म्हात्रे, नीलेश लक्ष्मण पाटील, भार्गव गजानन म्हात्रे, पत्रकार पंकज ठाकूर आदींनी मिळून हे काम पूर्ण केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply