पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुका प्रिमियर लिग कबड्डी स्पर्धेमध्ये लोहारमाळ येथील आबासाहेब वॉरियर्स संघ अंतिम विजेता ठरला, तर दरेकर लायन्स संघ उपविजेता ठरला.
पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सरकार एबी ग्रुप आयोजित पोलादपूर कबड्डी प्रीमियर लीग (पीकेपीएल) 2023 ही लीग स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अलिबाग, शहरातून अनेक गुणवंत नावाजलेले खेळाडू अनेक शहरातून सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये लोहारे शिवकन्या मुलींनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये दरेकर लायन्स संघ उपविजेता ठरला, तर देशमुख 7 स्टार आणि संभाजी ब्रिगेड पोलादपूर या संघांना तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले, राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, मनसेचे चेतन उतेकर, हनुमंत जगताप तसेच अन्य मान्यवर या वेळी आवर्जून उपस्थित राहिले.
स्पर्धेच्या शुभारंभाच्या वेळी पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश कदम आणि अन्य पदाधिकारी तसेच आयोजक सरकार एसडी ग्रुपचे सदस्य यांच्या उपस्थितीत 565 किलो वजन उचलणारी वेटलिफ्टर प्रतिक्षा गायकवाड आणि आद्यपत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकारिता पुरस्कार विजेते शैलेश पालकर तसेच सचिन दरेकर, सुरवसे, मोरे आदी शिक्षक, शालेय कबड्डी खेळाडू चैतन्या मांढरे आदींचा सन्मान करण्यात आला. शालेय क्रीडा स्पर्धेत 14,17,19 वर्षे या गटात जिल्हास्तरावर पारितोषिक प्राप्त शाळांचा सन्मान करण्यात आला.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …