Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भुयाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर येथील भुयाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खारघरमधील सेक्टर 3 येथील भुयारी मार्गाचा पुनर्विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

खारघरमधील सेक्टर 3 येथील भुयारी मार्गाचा पुनर्विकास होणे आवश्यक होते, त्यासंदर्भात नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी सिडकोकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता या भुयाराचा पुनर्विकास होणार आहे. या भुयारी कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सांस्कृतिक सेलचे कीर्ती नवघरे, महिला मोर्चा सरचिटणीस बिना गोगरी, गुरुनाथ म्हात्रे, सुरेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply