Breaking News

कराडे खुर्द ग्रामपंचायतीकडून अपंग लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी भागातील कराडे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधी अंतर्गत पाच टक्के निधी वाटप करण्यात आले. या वेळी कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 21 लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी (उदा. तीनचाकी सायकल, कुबड्या, कानयंत्र आदी) प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश अपंग लाभार्थ्यांना देण्यात आला.

धनादेशाचे वाटप सरपंच भारती हेमंत चितले, उपसरपंच यशश्री योगेश मूरकुटे, ग्रामसेवक संदीप लक्ष्मण धारणे, ग्रामपंचायत सदस्य मिनल ठोंबरे, प्रमिला पाटील, मुकेश पाटील, नलिनी कारंदे, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे, रेवती भोईर, माधुरी चितळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 21 अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजारांचा धनादेश मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply